दुचाकी अपघातात जखमी महिलेचे निधन…

मळगाव येथे घडला होता अपघात: मिरज येथे सुरू होते उपचार

सावंतवाडी
दुचाकी वरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कर्नाटक विजापूर येथील सौ हिराबाई किसन कर्पे (३४) या मजुरी महिला कामगाराचे मिरज येथे रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज निधन झाले. हा अपघात ७ नोव्हेंबरला मळगाव येथे घडला होता.


मयत हिराबाई या पती पती किसन कर्पे याच्यासह मोटारसायकलवरून मजुरीसाठी मळेवाड येथे जात होते. यावेळी मळगाव येथे स्पीडब्रेकरचा अंदाज न आल्याने येथे झालेल्या अपघातात त्या मोटरसायकल वरून खाली पडल्या यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यावर सावंतवाडी प्राथमिक उपचार करून अधिक उपचार करता सांगली मिरज येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले याबाबतची खबर पती किसन कर्पे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली त्यावरून येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page