हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल करण्यात आला सन्मान
⚡मालवण ता.१३-: कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मालवणच्या उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाली आहे. दीक्षांत समारंभात ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
मानद डॉक्टरेट ही कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच ज्या त्या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येते. कृषी क्षेत्रातील अशा प्रकारची डॉक्टरेट जाहीर झालेली फोंडेकर या महाराष्ट्रातील दुसऱ्या व्यक्ती असून पहिली डॉक्टरेट अहमदनगरचे आदर्श ग्राम संकल्पनेचे जनक पोपटराव पवार यांना गेल्यावर्षी हस्ते प्रदान करण्यात आलीहोती. तसेच क्रीडा क्षेत्रातील महेंद्रसिंग धोनी, कला क्षेत्रातील अमिताभ बच्चन यांना, राजकारणातील कार्याबद्दल नितीन गडकरी यांना या आधी डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती. यावेळी वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राचे डॉ. व्ही. एस. देसाई आणि कार्यालय अधीक्षक एस. जी. नाईक यांच्याकडून फोंडेकर यांना डॉक्टरेट आणी पुढील जबाबदारीची जाणीव तसेच यु ट्यूब चॅनेल चालू करण्याबाबत आणि राज्यातील आंबा बागायतदारांना मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले.
