मोठ व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्त्वाचा…

विशाल परब:आरोस बाजार आयोजित दीपावली शो टाईमचे थाटात उद्घाटन..

⚡सावंतवडी ता.१३-: मोठ व्हायचं असेल तर कर्तृत्व महत्त्वाचा आहे. दांडेली सारख्या छोट्या गावातून आज दोन पोलीस निर्माण झाले.येथील मुले शासकीय नोकरीत लागली आणि त्यांचा सत्कार करण्याचा भाग्य मला लाभले.हा माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. युवकांची फौज खेड्यागावातून निर्माण झाली पाहिजे. यासाठी जे काय करायचं असेल ते करण्यासाठी माझी तयारी आहे.दांडेली गावातील लोकांनी मला मदतीची केव्हाही हाक मारा.मी सदैव तुमच्या पाठीशी विशाल परब म्हणून उभा आहे. असं भावनिक आवाहन भाजप युवा मोर्चा चे प्रदेश चे उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.

दांडेली येथील जय हनुमान मित्र दांडेली आरोस बाजार आयोजित दीपावली शो टाईम च्या उद्घाटन प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल परब व्यासपीठावरून बोलत होते.
या दीपावली शो टाईमचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर योगेश नाईक,दांडेली गावचे जेष्ठ नागरिक पांगम यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page