मळगाव येथील किल्ले व ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद…

अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ- : मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने एक अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला असून या मंडळाच्यावतीने मळगाव येथे प्रथमच भव्य दिव्य असे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या तीन दिवसीय प्रदर्शनास मळगाव तसेच पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते काल बुधवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर, मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याधापिका प्रमिला राणे-सावंत, शिवप्रेमी पांडुरंग राऊळ, भूषण मांजरेकर, माजी सैनिक अंतोन फर्नाडिस, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाटेकर, अशोक राऊळ आदी उपस्थित होते.

१२ नोव्हेंबरपासून या प्रदर्शनास सुरुवात झाली असून १४ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. यात काही निवडक किल्ले प्रदर्शन, ऐतिहासिक वस्तू व माहिती यांचे प्रदर्शन, मातीपासुन बनविलेल्या महाराष्ट्रातील काही निवडक गड-किल्ल्यांची प्रतिकृती व त्यांची माहिती तसेच ऐतिहासिक वस्तू व माहिती देण्यात येत आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील काही पत्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या यशस्वीततेसाठी अष्टविनायक कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, उपाध्यक्ष सिध्देश तेंडोलकर, सचिव उदय फेंन्द्रे, खजिनदार संदेश सोनुर्लेकर, प्रमुख सल्लागार बाप्पा नाटेकर, सदस्य ज्ञानेश्वर राणे, सिध्देश फेंन्द्रे, चैतन्य नाटेकर, प्रथमेश खडपकर, अर्थव धुरी, मयुरेश नाईक, निलेश नाटेकर, प्रसन्न सोनुर्लेकर, मनिष नाटेकर उमेश कोंडये, बाळा होळकर

यांनी विशेष मेहनत घेतली. मंडळाने भरविलेल्या या प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मळगाव तसेच परिसरातून अधिकाधिक लोकांनी तसेच शालेय मुलांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देऊन हे प्रदर्शन आवर्जून पहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page