विविध स्पर्धेत खर्डेकरच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡वेंगुर्ला ता.१३-: स्पोटर्स पॅव्हेलियन मरिन लाईन मुंबई येथे संपन्न झालेल्या मुंबई विद्यापिठ अॅथलेटिक्स स्पर्धेत बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील कु. गायत्री राणे हिने १०० मीटर हर्डसमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक व ४०० मीटर हर्डस्मध्ये कास्य पदक, अपूर्वा परब हिने कबड्डी स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले. दरम्यान, डेरवण-चिपळूण येथे घेतलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत निकिता निनावे हिने तिहेरी उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि हेप्टथ लॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर भूमिका माशलकर हिने दहा हजार मिटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.


सर्व विजेत्या खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्राचार्य एम.बी.चौगले, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.डॉ.विलास देऊलकर, प्रा.डि.जे.शितोळे, प्रा.व्ही.पी.देसाई, प्रा.डी.आर.आरोलकर, प्रा.कमलेश कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page