सोनुर्ली हद्दीतील अवैध क्वारिंवर कारवाई करावी…

महेश पांचाळ:येत्या १६ तारखेला जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कारवाईची करणार मागणी..

⚡सावंतवाडी ता.१३-: सोनुर्ली हद्दीत अवैध्यरित्या सुरु असलेल्या क्वारीवर शासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे येत्या १६ तारीखला जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन सदरच्या खाणींवर चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे, असा इशारा भाजपचे माजी तालुका सरचिटणीस महेश पांचाळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, सोनुली हद्दीत अवैध्यरित्या मोठ्या प्रमाणात क्वारी व क्रशर चालू असून त्यांना देण्यात आलेली ग्रामपंचायत परवानगी सुमारे दोन वर्षांपूर्वी संपलेली आहे, मात्र तरीही ती क्वारी व क्रशर आजही चालू आहे. यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड काढला जातो सदर क्वारी एका सर्व्हे नंबरमध्ये दाखवून त्या सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन लगतच्या अनेक सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टींग करुन काढला जातो. या ब्लास्टींगमुळे घराना तडे गेलेत. तसेच माती टाकल्यामुळे माती वाहून येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या शेतकऱ्यांना घेऊन उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला असून ग्रामपंचायतीने चौकशी न करता घाईगडबडीने या खाणीना परवानगी देऊ नये, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page