जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर यांनी दिली माहिती..
⚡कणकवली ता.१३-: वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या अटीची सवलत आता ३१ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनाच मिळणार होती ती आता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलही ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण विभागाकडील दि. ४ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन निर्णय दि. २० जुलै २०२१ मधील परिच्छेद क्र. ५ मध्ये नमूद वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या अटीतून दि. ३१ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सवलत देण्यात आलेली होती. त्याची मुदत दि. ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सवलत देण्याबाबत वाढविण्यात आली.
मात्र हा शासन निर्णय राज्यातील खाजगी संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांसाठीच लागू होणार असल्याने तो शासन निर्णय राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांनाही लागू होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे जिल्हा शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, यांनी विनंती निवेदन सादर केले होते. त्याचवेळी संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनाही सदर शासन निर्णयातील त्रुटी दूर होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे शिफारस करण्याबाबत दि. ११ सप्टेंबर २०२३ च्या पत्राने विनंती निवेदन सादर केले होते. सदर निवेदनाप्रमाणे संचालक महोदय यांनी दि. २ नोव्हेंबर २०२३ च्या पत्राने प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सदर त्रुटी दूर होण्याबाबत शिफारस केली आहे.
त्यामुळे वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रशिक्षणाच्या अटीची सवलत आता ३१ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनाच मिळणार होती ती आता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधीलही दि. ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना मिळणार आहे. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब, रमेश आर्डेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
