*💫मालवण दि.१२-:* परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारी मुळे त्रस्त असलेल्या पारंपरिक मच्छीमारांचा आवाज उठवून केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्ग तर्फे आज 12 मार्च पासून सहाय्यक मस्य आयुक्त कार्यालय येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे . या पाश्र्वभूमीवर आज सकाळी मच्छी विक्री आणि खरेदी बंद ठेवण्यात आली होती . यामुळे लिलाव होत असलेल्या ठिकाणी मासे खरेदी साठी आलेल्या खवय्यांना माघारी परतावे लागले होते . मच्छीमार एकजूट यानिमित्ताने दिसून आली आहे . उपोषणाच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . दंगा काबु पथकही तैनात करण्यात आले होते . पन्नास मच्छीमार यांना उपोषणस बसण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे .
मालवणमध्ये मच्छीमारांचे साखळी उपोषण सुरु…
