*महसूल विभागात खळबळ; चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
*💫सावंतवाडी दि.१२-:* बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार आयशर डंपर वर काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने व पोलिस प्रशासनाने संयुक्त रित्या कारवाई करत पकडले होते. त्यातील एक डंपर रात्री संबंधित डंपर चालकाने पळवला असून, या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यानी या घटनेला दुजोरा दिला असून, संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.
