विजेच्या समस्या सोडवा,अन्यथा वेगळा मार्ग…

राजन तेली; विज अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

⚡सावंतवाडी ता.१०-: येथील विधानसभा मतदारसंघातील विजेच्या असलेल्या समस्या येत्या वीस दिवसाच्या आत सोडवा अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे विज अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान या संदर्भात देखील येत्या पंधरा दिवसात पालकमंत्री यांच्या उपस्थिती देखील बैठक लावण्यात येणार असल्याचे देखील श्री तेली यांनी यावेळी सांगितले.श्री.तेली आज नागरिकांच्या असलेल्या विजेच्या विविध समस्या बाबत आज श्री.राजन तेली यांनी भाजपच्या माध्यमातून वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,भाजप तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष दिलीप भालेकर,विनोद सावंत आदी भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page