सुटका झालेल्या पारंपारिक मच्छिमारांचे जोरदार स्वागत…

फटाके फोडून व लाडू वाटून मच्छिमारांच जल्लोष:संघटनेच्या वतीनेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत..

मालवण (प्रतिनिधी)

तळाशीलच्या समुद्रात पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन धारक यांच्यात झालेल्या संघर्षानंतर याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित सात पारंपरिक मच्छीमारांची आज जामिनावर सुटका झाल्याने या सर्व मच्छीमारांचे मालवण शहरातील भरड नाका येथे तालुक्यातील पारंपारिक मच्छीमारांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. फटाके फोडून आणि लाडू वाटत मच्छिमारांनी जल्लोष करत पारंपारिक मच्छिमारांच्या एकजुटीचा विजय असो” अशी घोषणाबाजी केली.

अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात लढा देणाऱ्या पारंपारिक मच्छिमारांनी तळाशीलच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन पर्ससीन नौकांवर हल्ला करीत त्यावरील खलाशांना मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तळाशील येथील सात मच्छिमारांना अटक केली होती. या मच्छिमारांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या मच्छिमारांची जामिनावर सुटका झाल्यावर आज मालवण भरड नाका येथे त्यांचे पारंपारिक मच्छिमारांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भरड येथील सन्मित्र रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीनेही पारंपरिक मच्छीमारांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी हरी खोबरेकर, रविकिरण तोरसकर, बाबी जोगी, मिथुन मालंडकर, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, भूषण जुवाटकर, रिक्षा व्यावसायिक प्रकाश करंगुटकर, नंदू वस्त यांच्यासह अन्य मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page