सावंतवाडी नगर परिषदेला दिव्यांग निधी प्राप्त…

बबन साळगावकर यांनी वेधले होते लक्ष:१११ दिव्यांग व्यक्तींना मिळणार लाभ

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी नगर परिषदेकडे अखेर दिव्यांग निधी रिलीज केला असून यात 10 लाख 74 हजार रुपये सावंतवाडी नगर परिषद हद्दीतील जमा केला असून यात 111 दिव्यांगन लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्याबाबत लक्ष वेधले होते अखेर त्यांच्या मागणीला यश आल्याची माहिती श्री साळगावकर यांनी यावेळी दिली.दरम्यान मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन सदर पैसे रिलीज केले त्याबद्दल मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे देखील श्री साळगावकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page