Headlines

जन आरोग्य योजनेला असनिये पंचक्रोशीतील नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी ता.०३-:केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जन आरोग्य योजनेला असनिये पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र असानिये येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर व्ही जी माणगावकर हे घरोघरी फिरून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढत आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार असून जनजागृतीसाठी फुकेरी घारपी कोनशी असनिये येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिर तसेच जनजागृती आरोग्य मेळाव्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यावेळी आरोग्य सेवक संतोष पारधी आरोग्य सेविका सौ एडगे सिस्टर व स्वयंसेविका तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page