Headlines

पट संख्या कमी,मात्र अमृत महोत्सव दिमाखदार..

असलदे गावठण शाळा
इतर शाळांसमोर आदर्श; प्रदीपकुमार कुडाळकर.

⚡कणकवली ता.०३-: जि.प.शाळा असलदे गावठण न. 2 या विद्यालयाचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर 2023 साजरा करण्यात आला. हा अमृत महोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी अमृत महोत्सव कमिटीने दिवस रात्र मेहनत घेत प्रयत्न केले.त्याला साथ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने विशेष मेहनत घेत कार्यक्रमासाठी सहकार्य केले. .या कार्यक्रमासाठी अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तांबे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री प्रदीप कुमार कुडाळकर ,उपशिक्षणाधिकारी थोरात,गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्र प्रमुख अनघा चिपळूणकर,मुख्याध्यापक शरद कदम, शिक्षिका स्मिता कदम, सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे, तंटामुक्त समिती मनोहर प्रभुखोत,अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष शामराव परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहुल घाडी ,खजिनदार तुषार घाडी,संतोष घाडी, अशोक पाताडे, जयप्रकाश पाताडे, प्रशांत तांबे,सुरेश सुतार,देविदास जांभळे,सुदिन तांबे,महादेव परब,दिनेश शिंदे, सदाशिव घाडी,उपस्थित होते.

अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तांबे म्हणाले की, या शाळेसाठी प्रशासनाचे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या प्रशासनाने आम्हाला वेळीच पूर्ण करून द्याव्यात.ही शाळा कायम कशी सुरू राहील यासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी लक्ष दिले पाहिजे तसेच प्रशासनाने ही याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर म्हणाले , या शाळेमध्ये मुलांची पटसंख्या अवघी 9 असून सुद्धा अमृत महोत्सव समितीने दिवसभर असा भरगच्च कार्यक्रम करण्याचा धाडस या समितीने केला आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या गावातील सर्व ग्रामस्थांचे चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. असे गौरव उद्गार कुडाळकर यांनी काढले.
कै. तातोबा विश्राम घाडी यांनी गावातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्याकाळी त्यांनी स्वखर्चाने इमारत बांधून दिली.या इमारतीला आज 75 वर्ष पूर्ण झाली. आज तातोबा विश्राम घाडी यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये हा अमृत महोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी कै. तातोबा विश्राम घाडी यांच्या कुटुंबीयांचा अमृत महोत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गावातील ज्येष्ठ नागरीक,सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, आजी माजी शिक्षक वर्ग,उच्च शिक्षित विद्यार्थी,10.वी 12 वी पदवीधर,तसेच राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी त्यांचा देखील सन्मान करण्यात आलाय.तसेच या अमृत महोत्सव समितीने आजी-माजी शिक्षक वर्गांचे सुद्धा सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले

You cannot copy content of this page