डी.एड. कॉलेजच्या सन 1984 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा…
⚡कणकवली ता.०३-: 40 वर्षांपूर्वीच्या डी.एड. कॉलेजमधील लाईफच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय, कणकवलीच्या सन 1984 बॅचचे विद्यार्थी ‘स्मृतींचा चैत्रमोहर ’ या टॅगलाईन खाली पुर्नभेट सोहळ्याच्या निमित्ताने जानवली येथील हॉटेल नीलम
कंट कंट्रीसाईटमध्ये एकत्र आले. यात संवाद, गप्पाटप्पा, जुन्या आठवणींना उजाळा देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत
सवंगड्यांनी ‘ओ भी क्या दिन थै’ म्हणत धम्माल केल्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
डी.एड. कॉलेजच्या लाईफ विश्वात काही क्षणांसाठी पुन्हा रमले. एकत्र संवाद, गप्पाटप्पा रंगल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी डी. एड. कॉलेज लाईफच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी
स्नेहमेळाव्या सोहळ्यात त्या वेळेच्या शिक्षक असलेल्या श्रीमती आपटे, श्री जाधव , लिपिक श्री. मुसळे व राणे,शिपाई कदम व जाधव यांना निमंत्रित केले होते. बॅचतर्फे
त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व जास्वंदीचे रोपटे देऊन सन्मान केला. आपटे, जाधव, मुसळे राणे व कदम यांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. 40 वर्षांनंतर माझे विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे
गाजवले कर्तृत्वपाहून या सर्वांचे मन अभिमानाने भरून आले होते. पुर्नभेटीच्या या सोहळ्यानिमित्त पुन्हा एकत्र आलेल्या क्लासमेटच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता अन् मनात हर्षोनंद झाला होता. स्मृतीचा चैत्र्यमोहर अविस्मरणीय रहावा म्हणून नलिनी भोगटे या विद्यार्थिनीने सर्वांना
निरंजन तर आजगांवकर व मळगांवकर या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक व क्लासमेट यांना 1984 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटोची प्रत
भेट म्हणून दिली. प्रास्ताविक त्रिबंक आजगांवकर यांनी केले. सूत्रसंचालन विलास मळगांवकर यांनी केले. आभार नलिनी भोगटे यांनी मानले. शेवटी जाधव सरांच्या आग्रहाखातर पुढील गेट टू गेदर इचलकंरजी येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले. या सोहळ्यात 40 पैकी 30 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
