बेकायदेशीरपणे गुरे वाहतूक करणारा बोलेरो पिकअप गाडी स्थानिकांनी पकडली…

सकाळची घटना;पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी..

⚡मालवण ता.०३-: मालवण शहरानजीकच्या गावातून कुडाळच्या दिशेने बोलेरो पिकअप गाडीत बेकायदेशीरपणे वाहतूक करणारी गाडी आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास देऊळवाडा सागरी महामार्ग येथे मालवणातील जागृत नागरिकांनी रोखून धरत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली दरम्यान ही गुरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालवण तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका टेम्पो मधून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मालवण मधील तरुणांनी फिल्डिंग लावत हा टेम्पो गाठून त्याचा पाठलाग सुरु केला. अखेर देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता पूर्ण बंदिस्त केलेल्या या टेम्पोच्या आतमध्ये तीन गुरे दिसून आली. यामध्ये एक गाय, एक बैल आणि एक वासरू मिळून आले. या गाडीच्या चालकाकडे विचारणा केली असता त्याच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो पोलीस ठाण्यात नेण्यात आला.

यावेळी सीझर डिसोजा, ललित चव्हाण, अनिकेत फाटक, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पंकज गावडे, पार्थ वाडकर, संदेश फाटक, शैलेश नामनाईक आदींचा समावेश होता. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु होती

You cannot copy content of this page