उद्योजक मिलिंद शेटकर यांच्याकडून बांधा निमगाव शाळेला फॅन भेट…

⚡बांदा ता.०३-: कै. श्री मधुकर कृष्णाजी शेटकर यांच्या स्मरणार्थ उद्योजक श्री मिलिंद शेटकर यांच्या कडून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा शाळेची गरज ओळखून तीन वर्गासाठी तिन वॉल फॅन देण्यात आले.

बांदा शहरातील शेटकरवाडी येथे मूळ घर असून सध्या ते डोंबवली येथे व्यवसायानिमित्त राहतात. यावेळी मिलिंद शेटकर व सौ. मधुरा शेटकर यांचे गुलाबपष्प देऊन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ यांनी त्याचे स्वागत केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य त्यांचे बंधू श्री शैलेश शेटकर, शिक्षक मालू लांबर, सुपर्णा भाईप, लुईजा गोंसल्विस, सुरेखा गावडे मॅडम उपस्थित होते.

You cannot copy content of this page