गणित ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला नं.१चे यश

⚡वेंगुर्ला ता.०२-: अध्ययन संस्था मुंबई तर्फे गणित विषयावर आधारित घेतलेल्या तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील १२ शाळांनी सहभाग घेतला होता. यात केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ने नेत्रदिपक यश पटकाविले. मयंग नंदगडकर व नील पवार या जोडीने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अजिक्यपद मिळविले.

  इयत्ता सहावीतून सार्थक यादव, हर्ष पिळणकर, मयंक नांदोडकर, जोया बागवान तर सातवीतून रणवीरसिह रावळ, ईशा गिरप, श्रावणी गिरी, वैष्णवी केरकर आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शिक्षिका गायत्री बागायतकर, लिना नाईक, रिमा मालवणकर, प्रगती आव्हाड, सौ.वेंगुर्लेकर, सौ.सरवदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी अभिनंदन केले.
You cannot copy content of this page