बांदा मराठा समाज उद्या देणार तहसीलदार यांना निवेदन…

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी निर्णय:आरक्षण देण्याची करणार मागणी…

⚡बांदा ता.०२-: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत आरक्षण देण्यात यावे यासाठी बांदा मराठा समाजाच्या वतीने उद्या शुक्रवारी (ता. ३) रोजी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बांदा मराठा समाजच्या कार्यकारिणीची अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांच्या अध्यक्षतेखाली श्री भूमिका मंदिरात बैठक संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष आनंद गवस, सचिव म. गो. सावंत, खजिनदार राकेश परब, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, राजेश सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गोविंद सावंत, गिरीश भोगले, अक्षय परब, विराज परब, दीपक सावंत, परिमल सावंत, स्वप्नील सावंत, निलेश कदम आदी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बांदा शहरातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव व भगिनी एकत्रित येऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. समाजात जनजागृती करण्यासाठी व विविध उपक्रम भविष्यात राबविण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
बाळु सावंत म्हणाले की, समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज असून जरांगे पाटील यांच्या भूमिकेला बांदा मराठा समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. शासनाने लक्ष वेधण्यासाठी उद्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन निवेदन देण्यात येणार आहे. हे समाजकार्य असल्याने मोठ्या संख्येने बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन केले.

You cannot copy content of this page