कणकवलीत हायवे प्रशासन सुस्त नागरिक त्रस्थ…

प्रशासनाला केव्हा येणार जाग ; राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल

⚡कणकवली ता.०२-: मुंबई गोवा हायवेचे काम पूर्ण झाल्याच्या कल्पनेने हायवेचे काम घेतलेल्या ठेकेदारांना वाटले असेल आपले काम संपले , पण ज्या मुलभूत सुविधा सामान्य नागरिकांना मिळायला पाहिजे, त्या कुठे आहेत, मिळाल्या नाहीत , याचे कारण काय ? असा सवाल
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी केला आहे.
याबाबत कणकवली तहसिलदार दिशांत देशपांडे यांना राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदन सादर केले यावेळी सोबत सि. आर. चव्हाण उपस्थित होते.
आज कणकवलीमध्ये अप्पासाहेब पटवर्धन चौक ते दोन्ही बाजूंना, म्हणजे गड नदी ते जाणवली नदीच्या पर्यंत उड्डाण पुलाच्याखाली अस्वच्छता आहे.तसेच पुलाच्या बाजुने जो रस्ता गाड्यांना ये जा करण्यासाठी तो काही ठिकाणी अरुंद आहे.रस्त्यावर चालताना सामान्य माणसाला चालण्यासाठी जी फुट़पाध ठेवली आहे, ती कशासाठी, दुकानांचे बोर्ड लावण्यासाठी?.फुटपाथवर वयस्कर माणसांनी चालायचे कसे, जागाच नाही तर चालणार कसे?
फुटपाथच्या बाजूला जी वाहने तासंतास पार्कींग करून ठेवलेली असतात? सर्वसामान्य नागरिक हाच प्रश्न विचारतोय. अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे आल्यावर, कोणी त्यांच्या या समस्येवर विचार करणार, आहे की नाही?ना पार्किंगची व्यवस्था ना, बाहेरील खरेदीसाठी कणकवलीमध्ये येणाऱ्यांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था, हायवे प्रशासना कडून या सर्व सोयी सुविधा करून घेणार कोण, कोणाची जबाबदारी आहे ?
आज अर्धवट तोडलेल्या घरांमुळे, काय अवस्था झाली आहे, कणकवलीची याचा विचार कोण करणार आहे की नाही? या सर्व बाबींचा विचार केला जावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री .पेडणेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page