ओबीसी कोठ्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ;…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन सादर..

⚡सावंतवाडी ता.०२-: ओबीसी कोठ्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यात यावी असे निवेदन मराठा समाजाचे युवा नेते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार पाटील यांना सादर करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपा अध्यक्ष राजन तेली भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय वसंत गोंदावळे, चराठे उपसरपंच अमित मदन परब- अजय गोविंद सावंत – माजगांव,
श्री मनोज चंद्रकांत नाईक- सावंतवाडी, समिर मुरारी पालव – – ईन्सुली, विनोद सावंत – सावंतवाडी , साईनाथ शब्द जामदार ,आनंद नेवगी,भरत वासुदेव गवस, प्रजा संदीप गावडे, भास्कर राऊळ,
दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page