आम. नितेश राणे:राजीनामा देण्याची तुमच्या घरातून सुरवात करा..
⚡कणकवली ता.०१-:
आमचं सरकार टिकणार आरक्षण देणार.जरांगे पाटीलांनी राजकीय भाषा सुरू केली आहे.त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गाल बोट लावू नये. हिंसेला समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये.असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत.ह्याच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले. तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही. राजीनामा देण्याची तुमच्या घरातून सुरवात करा. असे आव्हान भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले.
कणकवलीत येथे पत्रकारांशी ते बोलत होते. जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. याची खात्री देतो.कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू असे नितेश राणे यांनी सांगितले.
जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलूनये हा मैत्रीचा सल्ला
माझी किंमत भाजपला माहीत आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर राजकीय बोलायचं बंद करा.हा माझा मैत्रीचा सल्ला आहे. उद्या बनसोडे साळुंखे हे कोण हे समजेल.त्यावेळी कळेल. प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याच उत्तर विनायक राऊत यांनी द्यावं.सरकार वडापावची गाडी नाही. आमचं सरकार कायम टीकणार आहे.त्यामुळे दोन्ही राऊतांना डबलबारीसाठी बोलवा येवढेच काम त्यांना राहिले आहे.
