अधिकारी, कर्मचारी सहभागी:३ नोव्हेंबर राहणार लेखणी बंद
⚡ओरोस ता.०१-: वस्तू व सेवा कर “विभागाची पुनर्रचना व्हावी व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, यासाठी वस्तू व सेवा कर अधिकारी -कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने 30 ऑक्टोंबर 2023 पासून राज्यव्यापी असहकाराचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आजपासून या आंदोलनाने वेगळे रूप धारण केले असून लेखणी बंद करीत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे.
जिल्हाधिकारी इमारतीच्या वस्तू व सेवा कर कार्यालयाबाहेर असलेल्या प्रवेशद्वारा समोर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी रजिस्टर वर स्वाक्षरी करीत ठिय्या मांडला आहे. कार्यालय बंद करीत वर्ग १ ते वर्ग ४ अधिकारी कर्मचारी या लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात राज्यकर उप आयुक्त अभिजीत पोरे, सहाय्यक राज्य कर आयुक्त प्रशांत कोरे, राज्य कर अधिकारी अनुज रासम, सुधीर नार्वेकर, तेजस्विनी शिंदे, व्यवसाय कर अधिकारी डॉ दिपाली पाटील, अनिकेत रामाने आदी २८ ते ३० अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
