Headlines

कनक रायडर्स च्या सायकलपतुंची अनोखी नाईट सायकल रायडिंग

महाशिवरात्री निमित्त आयोजन

कणकवली दि .11 मार्च (प्रतिनिधी ) : महाशिवरात्रीनिमित्त कणकवली शहरातील कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी 104 किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक सायकल रायडिंग कार्यक्रमात कणकवली शहरातील कनक रायडर्स चे सायकलपटू सहभागी असतात. महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी वेगळे करण्याची कल्पना कनक रायडर्स चे मकरंद वायगंणकर यांना सुचली. महाशिवरात्र म्हटलं की श्रीशंकर भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन शंकराच्या चरणी लिन होतात. मकरंद वायंगणकर यांनी बुधवारी रात्री 8 वाजता आपल्या कनक रायडर्स च्या व्हाट्सअप ग्रुपवर महाशिवरात्रीनिमित्त रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत सरप्राईज नाईट सायकल राईड करायची भन्नाट कल्पना मांडली. या नाईट सायकल रायडिंग चा थ्रिल अनुभवण्यासाठी कनक रायडर्स चे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे आणि एस एम हायस्कुल चा नववीतील विद्यार्थी नितांत चव्हाण हे लागलीच तयार झाले. कणकवली हुन बुधवारी रात्री 10 वाजता निघून नॅशनल हायवेवरील ओरोस, कुडाळ, झाराप बायपास मार्गे मळगाव आणि परत कणकवली असा 104 किलोमीटर चा प्रवास गुरुवारी पहाटे 4 वाजता पूर्ण केला. सायकलिंग करा फिट राहा असा संदेश देत कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी केलेल्या नाईट सायकल रायडिंगबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page