कलमठ मध्ये विजकनेक्शन तोडले…._

संदीप मेस्त्री यांनी धरले धारेवर;हफत्याने वीजबिल घेण्यास विजकर्मचाऱ्यांचा नकार

*💫कणकवली दि.११ -:* 14 हजार रुपयांच्या थकीत वीजबिलापोटी 4 हजार रु. देत उर्वरीत बिल भरण्याचे मान्य करत असतानाही वीज कर्मचाऱ्यानी घरगुती विजकनेक्शन तोडण्याची घटना कलमठ खालची कुंभारवाडी येथे घडली. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांनी घटनास्थळी धाव घेत विजकर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कलमठ गावातील खालची कुंभारवाडी येथील एका विजग्राहकाचे 14 हजार रुपये विजबिलापोटी थकीत आहेत. वीजबिल थकीत असल्याने वीजकर्मचाऱ्यांनी कनेक्शन तोडण्यासाठी त्यांच्या घरी गेले. घरात वीज ग्राहकाची वृद्ध आई होती. तिने विजबिलापोटी 4 हजार आता देते, उर्वरीत बिलाची रक्कम मुलागा कामावरून आल्यावर त्याला भरायला सांगते, तोवर वीज कनेक्शन तोडू नका अशी विनंती केली. मात्र विजकर्मचाऱ्यांनी हफत्याने वीजबिल न घेता सगळी रक्कम द्या अन्यथा विजकनेक्शन तोडणार असे म्हणत कनेक्शन तोडले. ही घटना समजताच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांनी घटनास्थळी जात विजकर्मचाऱ्यांना धारेवर धरले. लगतचे ग्रामस्थही आक्रमक झाले होते.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती.

You cannot copy content of this page