*💫वेंगुर्ला दि.११-:* रोट्रॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेज वेंगुर्ला आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ‘सबला‘ उपक्रमांतर्गत मठ हायस्कूल येथे ३० विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅडसचे वाटप करण्यात आले. रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष निहाल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी सिंधुदुर्ग झोनचे झेड.आर.आर. स्वप्नील परब, उपाध्यक्ष दुर्गेश पाटील, स्मिता पाटील, संपदा निकम, हरिता थोरात, बेरमनी गुडला, दत्तप्रसाद पवार, श्वेता खरात, मानस घाग उपस्थित होते. किशोरवयीय मुलींना मासिक पाळीच्यावेळी घेण्यात येणा-या काळजी व आहाराबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.पूजा कर्पे, सेक्रेटरी श्रुती शेडगे व रोटेरियन राजेश घाटवळ यांचे सहकार्य लाभले.
मठ येथे ३० विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅडसचे वाटप…
