गुन्हेगारी विरोधात महिलांनी आवाज उठवावा–अॅड.सुषमा प्रभूखानोलकर…

*💫वेंगुर्ला दि.११-:* तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यामध्ये राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे. पुजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारी विरोधात आता महीलांनी पुढे येऊन आवाज उठविला पाहिजे असे मत भाजपा जिल्हा चिटणीस अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्लातर्फे आतापर्यंत अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना कॅण्डल मार्च मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्मिता दामले, सारीका काळसेकर, गौरवी मडवळ, शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर, ऋतुला मेस्त्री, हसीना बेन मकानदार, अंकीता देसाई, संध्या गावडे, रीया केरकर, कृतिका साटेलकर, स्मिता कोयंडे, श्रद्धा गोरे, डॉ.अफशान कौरी, सीमा नाईक उपस्थित होत्या .

You cannot copy content of this page