पाककृती स्पर्धेत अंजली गोरे व यशस्वी मराठे प्रथम…

*💫वेंगुर्ला दि.११-:* भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेत अंजली गोरे तर सॅलेड डेकोरेशन व फ्रुटकार्व्हींग स्पर्धेत यशस्वी मराठे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत ४० महिला सहभागी झाले होते. उद्घाटन महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांच्या हस्ते झाले. जिल्हा चिटणीस अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, महिला जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, पंचायत समिती सदस्य गौरवी मडवळ, नगरसेवक साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, महिला तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, ऋतुजा मेस्त्री, हसिना बेन मकानदार, अंकिता देसाई, संध्या गावडे, रिया केरकर, कृतिका साटेलकर, स्मिता कोयंडे यांच्यासह तालुक्यातील महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत सर्व स्पर्धकांना हॅण्डवॉशचे वाटप करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – शाकाहारी पाककृती स्पर्ध-प्रथम-अंजली गोरे, द्वितीय-यशस्वी मराठे, तृतीय-श्रृती गिरप, उत्तेजनार्थ-पूजा म्हापणकर, रिया केरकर, सुजाता मराठे, फ्रुट सॅलेड व फ्रुट कार्व्हींग स्पर्धा-प्रथम यशस्वी मराठे, द्वितीय-साक्षी नार्वेकर, तृतीय-रिया केरकर. दोन्ही स्पर्धेतील या विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रोख पारितोषिक व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धांचे परिक्षण श्रद्धा गोरे व नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका शितल आंगचेकर हिने केले.

You cannot copy content of this page