असलदे गावठण जिल्हा परिषद शाळेचा २ नोव्हेंबरला अमृत महोत्सव…

⚡कणकवली ता.२९-: जि.प. शाळा असलदे गावठण नं. २ या शाळेचा अमृत महोत्सव २ नोव्हेंबर रोजी होत आहे. कै. तातोबा विश्राम घाडी यांनी ७५ वर्षांपूर्वी गावातील मुलांना इमारत प्रदान केली, कालांतराने इमारत जिल्हा परिषदकडे वर्ग देखील झाली. कै तातोबा विश्राम घाडी यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बाधणीतून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.कै तातोबा विश्राम गाडी यांचे कार्य फार मोठे होते.त्यांना साथ देण्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी जमीन देखील शाळेला दान केली.या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून या दानशूर व्यक्तींचे सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर ,गट शिक्षणाधिकारी किशोर गवस उपस्थित राहणार आहेत. ज्या व्यक्तीने शाळेसाठी जमीन दान केली त्या व्यक्तींचाही सन्मान केला जाणार आहे. गावातील ज्येष्ठ नागरीक,सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, आजी माजी शिक्षक वर्ग,उच्च शिक्षित विद्यार्थी,१०वी,१२ वी पदवीधर,तसेच राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी,पदाधिकारी यांचाही सन्मान केला जाणार आहे. २ नोव्हेंबर २०२३ रोजी हा अमृत महोत्सव सोहळा होत आहे त्यावेळी सकाळी ७.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा,तसेच सकाळी ९.३० ते ९.४५ राष्ट्रगीत,९.४५ ते १० वाजता स्वागत गीत,१० ते १०.१५ प्रस्तावना,१०.१५ ते १०.३० प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० ते १०.४५ वाजता शाळा माहिती पुस्तकीचे प्रकाशन, सत्कार समारंभ,त्यानंतर मान्यवरांचे मनोगत, दुपारी २ ते ३ वाजता महाप्रसाद, ३ ते ६ महिलांचे हळदी कुंकू,सायंकाळी ६ ते ७ स्थानिक गावातील भजने,आणि रात्री ८ वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम करणार आहेत. या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव अनंत पाताडे, उपाध्यक्ष शामराव परब, सहसचिव सुरेश सुतार,सदस्य देविदास जांभळे, जयप्रकाश पाताडे,सचिन परब,संतोष घाडी,अशोक पाताडे, महादेव परब,दिनेश शिंदे, सदाशिव घाडी,प्रशांत तांबे,सुदिन तांबे यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page