25 हजारचा मुद्देमाल हस्तगत;पाच जणांवर गुन्हा दाखल…
कणकवली 29 ऑक्टोंबर (प्रतिनिधी)-कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे.कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला.
काही दिवस या ठिकाणी जुगार सुरू असल्या ची गुप्त माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी याप्रकरणी रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलिसांच्या पथकासह छापा मारला.कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी कणकवलीत अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकली जाणार असून अवैध धंद्याबाबत माहिती मिळाल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कारवाईत कणकवली पोलिसांनी सिद्धेश मोरजकर, निलेश हेरेकर, संदीप वंडकर, राजेश परब व सुजित बाईत यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
