⚡मालवण ता.२७-: मराठ समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दर्शविला असून मराठा आरक्षण व आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवण तालुक्यातील पोईप बाजारपेठ येथे रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत मार्गदर्शन करणार आहेत. तरी या सभेला मराठा बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. सावंत यांनी केले आहे.
