Headlines

आरोंदा पोलीस दूरक्षेत्रावरील पोलीस हवालदार यांची तात्काळ बदली करा…

आरोंदा तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोरगावकर: अन्यथा लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.२७-: आरोंदा पोलीस दूरक्षेत्रावरील पोलीस हवालदार विनय केरकर व भगीरथ मोळे यांची तात्काळ बदली करा अन्यथा हा आरोंदा पंचक्रोशीतील ग्रामस्थ ११ नोव्हेंबर पासून पोलीस मुख्यालया समोर लाक्षणिक उपोषणाला बसतील असा इशारा आरोंदा तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोरगावकर यांनी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला दिला आहे.

श्री कोरगावकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले, की आरोंदा पोलीस दूरक्षेत्रावरील पोलिस हवालदार विनय केरकर व भगीरथ मोळे हे तीन वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत आहे त्यांच्याकडून मनमानी कारभार चालू असून याबाबत आनंदा ग्रामसभेतही ग्रामस्थांकडून आवाज उठवण्यात आला त्यानुसार त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरून काहीच हालचाली झाल्या नाही त्यामुळे तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा ११ नोव्हेंबर पासून पोलीस मुख्यालयासमोर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसोबत लाक्षणिक उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे त्यामध्ये माजी सरपंच उमा बुडे,विद्याधर नाईक यांच्या सह्या आहेत.

You cannot copy content of this page