देवगड तालुका संपर्कप्रमुख म्हणून सतीश कडू
⚡कणकवली ता.२७-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये
कणकवली तालुका संपर्कप्रमुख म्हणून राजेश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर जिल्हा परिषद मतदार संघ हरकुळ,कळसुली , नाटळ
फोंडा या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देवगड तालुका संपर्कप्रमुख म्हणून सतीश कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना नेते – सचिव (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
