⚡बांदा ता.२५-: येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धाच्या पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजपचे युवक प्रदेश सदस्य प्रथमेश तेली, भाजपच्या सिंधुदुर्ग महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, उपसरपंच जावेद खतीब, शिवसेना नेते सुशांत पांगम, उद्योजक बाबा टोपले, निलेश कदम, चेतन मुंगी, राजेश विरनोडकर, अमेय पावसकर, अक्षय मयेकर, सौ. अंकिता स्वार, मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे.
दांडिया स्पर्धा – (प्रथम अनुक्रमे तीन) – रायझिंग स्टार ग्रुप (गोवा), नवदुर्गा दांडिया ग्रुप आयी (दोडामार्ग), क्रियेटिव्ह दांडिया ग्रुप मुळगाव (गोवा), हिट जोडी – ईशा -गणेश (नवदुर्गा दांडिया ग्रुप, दोडामार्ग), उत्तेजनार्थ – त्रिमूर्ती दांडिया ग्रुप, वेंगुर्ला.
रेकॉर्ड डान्स (१५ वर्षाखालील)- प्रणिती वायंगणकर, अदिती मेस्त्री, अत्रेया काणेकर. उत्तेजनार्थ – श्राव्या होडावडेकर, स्वरा पावसकर, वैष्णवी उरणकर, तन्वी धारगळकर, मृण्मयी कल्याणकर. वेशभूषा स्पर्धा – मिष्टी सावंत, दिक्षा वरक, नैतिक मोरजकर. उत्तेजनार्थ – नरेश खोबरेकर, रचित गोवेकर, नील बांदेकर, प्रज्वल केसरकर, मीत विरनोडकर. (१५ वर्षावरील) – नेहा जाधव, समर्थ गवंडे, सायली राऊळ, उत्तेजनार्थ – मृणाल सावंत. ग्रुप डान्स – नाबर स्टार ग्रुप (बांदा), कला निकेतन ग्रुप (बांदा), डीजे ग्रुप बांदा, उत्तेजनार्थ – ऋतुजा वराडकर, आर्या ठाकूर ग्रुप.
करा ओके – शुभम नाईक गोवा, सुधाकर शानबाग (पर्वरी-गोवा), अंकिता पवार (सातारा). उत्तेजनार्थ – अनुष्का साळगावकर (गोवा), स्वप्नील गावकर (गोवा).
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राकेश केसरकर यांनी केले. सूत्रसंचालन जय भोसले यांनी केले.
राजन तेली म्हणाले, गांधीचौक नवरात्र मंडळ हे जिल्ह्यातील सर्वात जुने मंडळ असून गेली सातत्याने ३० वर्षे कार्यरत आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळ राबवत असलेले विविध उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. यावेळी श्वेता कोरगावकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
