अमित सामंत:खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी दोडामार्गात येणार..
⚡दोडामार्ग,ता.२१-:
सावंतवाडी दोडामार्ग विधानसभा
मतदारसंघाची निवडणूक यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे २७ तारखेला दोडामार्गात येत आहे. यावेळी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी हत्ती आणि आडाळी एमआयडीसी या दोन्ही ज्वलंत प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे, त्यामुळे हत्ती बाधित आणि तालुक्यातील तरुण तरुणींनी उपस्थित राहावे असे आवाहनही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.
मेळावा महालक्ष्मी सभागृहात होईल. हा दौरा झाल्यानंतर खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यावेळी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला मित्रपक्षाच्या सर्व
पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे, जेष्ठ नेते सुरेश दळवी, पुंडलिक दळवी, प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, विवेक गवस, विलास सावळ आदी उपस्थित होते.
