रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ तर्फे बांदा हायस्कूल मध्ये रक्त गट तपासणी शिबिर…

⚡बांदा ता.२१-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल आणि डॉ व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असणाऱ्या १०६ विद्यार्थ्यांनी घेतला दोन दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा आजच आपण दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आहोत हे समजले.

या शिबिराच्या आयोजनात रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे अध्यक्ष रोट. अक्षय मयेकर, रोट. संकेत वेंगुर्लेकर, रोट. मिताली सावंत, रोट. ईश्वरी कल्याणकर. तसेच प्रशलेच्या प्राचार्या सौ माधवी सावंत, प्रदिप देसाई, नंदकिशोर नाईक, गंगाधर काळे, अनिकेत सावंत, आप्पा राऊळ, मिलींद वळवी, सुमेधा सावळ, संतोष परब इत्यादि जणांचे सहकार्य लाभले. रक्तगट तपासणी श्री क्लिनिकल लॅब बांदाचे चालक श्री रुपेश देसाई यांच्या देखरेखी खाली झाली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार रक्तदाते आहेत त्यांना आपला रक्तगट माहीत असावा तसेच देश स्तरावर यूडायस पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करताना विद्यार्थ्यांचा रक्तगट माहित असावा उत्तम या साठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते असे यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी सांगितले. आभार प्रशालेचे शिक्षक अनिकेत सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page