सातेरी मंदिरातील महाप्रसादासाठी भाजपा नेते नीलेश राणे यांच्या माध्यमातून 400 ताटे…

दत्ता सामंत यांनी केली मानकऱ्यांकडे सुपूर्द

⚡मालवण ता.२०-: मालवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या देऊळवाडा येथील श्री सातेरी मंदिरात होणाऱ्या महाप्रसादासाठी आवश्यक असणारी ४०० ताटे भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी गुरुवारी मंदिराच्या मानकरी, गावकर यांच्याकडे सुपूर्द केली. भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते निलेश राणे आमदार होण्यासाठी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी देवीला साकडे घातले.

गुरुवारी सकाळी सातेरी मंदिर येथे समस्त सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार यांच्या उपस्थितीत ही ताटे भेट देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, संजय लुडबे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, कमलाकर कोचरेकर तसेच सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार, स्थानिक नागरिक उपस्थित होते. मंदिराला आवश्यक असणारी ताटे उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित गावकर मंडळींनी आभार व्यक्त करीत भाजपाच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार केला.

You cannot copy content of this page