डेगवे ब्राम्हण कृषी उत्पादक गटाला दिली भेट..
⚡बांदा ता.२०-: डेगवे येथील श्री देव ब्राम्हण कृषि उत्पादन स्वयंसहायता बचत गटाने सिंधुरत्न योजनेतून खरेदी केलेल्या शेती उपयोगी १६ अवजारांची आज उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांनी केली.
गट यांत्रिकीकरण अंतर्गत शेती उपयोगी औजार खरेदीबाबतचा प्रस्ताव बांदा मंडळ कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषि अधिकारी, सावंतवाडी यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेमधून प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालय सिंधुदूर्ग यांचेकडे पाठविण्यात आला होता. त्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून मंजूरी प्राप्त झाली होती. त्यानुसार सदर गटाने सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक बांदा यांच्या सहकार्याने शेती उपयोगी एकूण १६ औजारांची खरेदी केली त्यामध्ये त्यांना खरेदी किंमतीच्या ७५ टक्के एवढी सबसिडी मिळाली.
सदर प्रकल्पाची व अवजारांची तपासणी आज करण्यात आली. यावेळी श्री पाटील यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी गोरक्षनाथ गोरे, बांदा मंडळ कृषि अधिकारी युवराज भुईंबर, कृषी पर्यवेक्षक श्री. सरगुरू, डेगवे गावचे कृषी सहायक अतुल माळी तसेच गटाचे अध्यक्ष सूर्याजी देसाई व गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर गटाची आत्माअतर्गत नोंदणी करणे, त्यांना गट यांत्रिकीकरण औजार बँक स्थापनेबाबत मार्गदर्शन कृषि पर्यवेक्षक प्रकाश घाडगे व कृषी सहायक अतुल माळी यांनी केले. यामुळेच सदर गट आज सक्षमपणे उभा राहिला. सद्यस्थितीत जमीन धारण क्षेत्र कमी होत असल्याने गटशेतीला पर्याय नाही असे पोपटराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
