रेडी जि.प.विभागात उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का…

विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर सह पदाधिकारी, ग्रा.पं. सदस्य, व शिवसैनिक यांचा शिवसेना शिंदेगटात प्रवेश; मंत्री केसरकरांकडून स्वागत..

⚡वेंगुर्ले ता.२०-: रेडी जिल्हा परिषद विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, व शिवसैनिक यांनी आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उबाठाला मोठा धक्का मानला जात आहे.


आज सावंतवाडी येथे झालेल्या या पक्ष प्रवेशा मध्ये श्री. काशिनाथ निळकंठ नार्वेकर विभागप्रमुख तथा चेअरमन मच्छिमार संस्था शिरोडा, प्रथमेश बांदेकर शिरोडा, ग्रा.पं.सदस्य, रवी पेडणेकर शिरोडा माजी उपसरपंच, श्री. कृष्णा चोपडेकर, शिरोडा मा. ग्रा.प. सदस्य, सौ. शितल साळगांवकर वेंगुर्ले उपतालुका संघटिका, सौ. हर्षा परब उपविभाग संघटिका, श्री. संदिप मसुरकर शाखाप्रमुख, श्री. पुंडलिक कुबल शिरोडा माजी ग्रा.पं. सदस्य,सौ. संजना नार्वेकर शिरोडा माजी ग्रा.पं. सदस्य, श्री. गौरव बर्डे शिरोडा शिवसैनिक, श्री. संजय धुरी शिरोडा शिवसनिक, श्री. देशपाल कोळमकर शिरोडा शिवसैनिक, श्री. शिवा तारी शिरोडा माजी अध्यक्ष चौगुलेश्वर देवस्थान केरवाडा आणि श्री. संजय नार्वेकर शिरोडा शिवसैनिक यांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, तसेच जिल्हा उप संघटक सुनिल डूबळे, बाळा दळवी, सुनिल मोरजकर तसेच सचिन देसाई, योगेश तेली आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page