बियर शॉपीतून चोरीला गेलेला मोबाईल काढला शोधून…

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई..

ओरोस ता.२०-:

बियर शॉपीमध्ये विसरलेला मोबाईल चोरून नेणाऱ्या राजस्थान येथील सेंट्रिंग कामगाराला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी शोधून काढत मालक असलेल्या मालवण तालुक्यातील नांदोस येथील निकित संतोष नांदोसकर यांना परत केला. याबाबत निकित नांदोसकर यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
18 ऑक्टोबर 2023 रोजी निकीत संतोष नांदोस्कर वय 26 वर्ष व्यवसाय सिव्हिल इंजिनियर याचा Real Mi-8 Pro कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन पॉप्युलोन बियर बार, ओरोस खर्येवाडी येथील शॉपीच्या काउंटर विसरल्याने परत आणण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी मिळून आला नाही. याबाबत चव्हाण यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार 19 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीस अनुसरून या बिअर शॉपी येथे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करून, फुटेजमधील इसमाचा शोध घेतला असता सदर व्यक्ती ओरोस येथे राहत असल्याचे व त्याचे नाव जयराम अर्जुनराव वर्मा वय 23 वर्ष मूळ रा. किशोरपुरा तहसील निमका थाना, जिल्हा शिखर, राजस्थान असे असल्याचे व ओरोस मध्ये सेंट्रिंग व मोलमजुरीचे काम करत असल्याचे समजले. त्याला घटनेच्या अनुषंगाने चोरीस गेलेल्या मोबाईलबाबत चौकशी केली असता त्याने दारूच्या नशेत आपण मोबाईल घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर हा मोबाईल मूळ मालक निकित नांदोसकर यांना समक्ष पोलीस ठाणे येथे बोलावून त्याचा मित्र उन्मय पेडणेकर व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते ताब्यात देण्यात आलेला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानलेले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुपेश नाईक, शिपाई योगेश मुंडे यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page