सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांनी सजग व्हावे…

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर:कसाल येथे संपन्न झाले सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस..

ओरोस ता.२०-:

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यात गुन्हेगार सराईत असून नागरिकांना अनेक युक्त्या करून फसवित आहेत. याबाबत जन माणसांत जनजागृती झाली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर क्राईमबाबत सजग होवून घरातील व्यक्तींना सायबर क्राईम बाबत सुज्ञ बनवावे, असे आवाहन सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बोलताना केले.
19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 10.30 वा. ते 12.00 वा. मुदतीत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय कसाल, येथे सिंधुदुर्ग पोलीस दल व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या संयुक्तपणे “सायबर सेक्युरीटी व जनरल अवेअरनेस” अंतर्गत वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने काय सुरक्षा बाळगावी ? आणि याप्रकारचे गुन्हे कसे घडतात ? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पी पी टी प्रेझेंटेशन सादर करून सायबर गुन्ह्याबाबत प्रश्न पत्रिका देऊन विद्यार्थीकडून सोडवून घेण्यात आली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर बाबत शपथ घेऊन विद्यार्थ्याना व प्रशाळेला सायबर पोंपलेट्स वाटप करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हटकर, पोलीस उपनिरीक्षक राजेन्द्र दळवी, पोलीस नाईक रुपेश नाईक, महिला पोलिस शीतल नांदोसकर, प्रथमेश ओरोसकर, एम के सी एलचे श्रीमती सावंत व श्रीमती वायंगणकर, महाविद्यालया चे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी, असे 120 ते 130 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page