वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिवसेना जिल्हा समन्वयक श्री.सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने वेंगुर्ले नगर वाचनालय हॉल येथे रविवार २९ ऑक्टोबर रोजी भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वेंगुर्ले येथील ही स्पर्धा खुला गट आणि लहान गट अशा दोन गटात होणार आहे. खुल्या गटात प्रथम पाच क्रमांकाना अनुक्रमे २०००, १५००, १२५०, १००० व ७५० आणि चषक तर लहान गटात प्रथम पाच क्रमांकाना अनुक्रमे १५००, १२५०, १०००, ७५० व ५०० आणि चषक अशी बक्षिसे देऊन विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. लहान गटासाठी विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके पाच मुलगे आणि पाच मुली यांना मेडल देऊन गौरवण्यात येईल.
स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने खेळविली जाईल. नाव नोंदणीची अंतिम तारीख शनिवार २७ ऑक्टोबर असून स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी घेण्यात येणार नाही.स्पर्धा सकाळी ठीक सकाळी ९.०० वा. सुरु करण्यात येईल. लहान गटात ज्यांची जन्मतारीख १/०१/२०११ नंतरची आहे.त्यांनाच भाग घेता येईल (वयाच्या दाखल्यासाठी आधारकार्ड आवश्यक) आहे. स्पर्धे विषयीचे इतर नियम स्पर्धेच्या ठिकाणी सांगितले जातील. पंचांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.
स्पर्धेच्या अधिक माहिती साठी श्री. विजयकुमार पालकर ९९२२८८८५८९ किंवा श्री. संदिप परब ९४२३३००८४१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेना शिंदेगट युवक वेंगुर्ले शहरप्रमुख संतोष परब यांनी केले आहे.
