आंबोली पाठोपाठ आता पारपोली ची ओळख जगाच्या नकाशावर नेली जाणार…

मंत्री दिपक केसरकर:वाद न करता पारपोली ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वानी पुढे या..

⚡सावंतवाडी ता.२०-: पारपोलीतील जैवविविधता,विविध प्रकारची आढळणारी फुलपाखरे,
खळखळणारे नद्या लक्षात घेता आंबोली पाठोपाठ आता पारपोली ची ओळख जगाच्या नकाशावर नेली जाणार आहे. याठिकाणी फुलपाखराचे संरक्षण आणि संवर्धन करुन फुलपाखराचे गाव हा स्टेटस पारपोलीला देण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री तथा रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिली.

तर राजकारणापलीकडे जाऊन गावाचा विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन वाद न करता पारपोली ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वानी पुढे या असे आवाहनही श्री केसरकर यांनी केले.
आंबोली गावात वन विभागाच्या माध्यमातून आयोजित फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी,सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड,माजी आमदार राजन तेली, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पारपोली सरपंचकृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, पारपोली या गावात आढळणारी विविध प्रकारचे फुलपाखरू लक्षात हे गाव फुलपाखरांचे गाव घोषित करण्यात आले परंतु आंबोलीची ओळख ज्याप्रमाणे आज जगाच्या नकाशावर झाली आहे तीच ओळख पारपोलीची होण्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि याचाच भाग म्हणून रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून फुलपाखरू महोत्सव या ठिकाणी घेण्यात आला मात्र एखादा महोत्सव घेऊन गावाचा विकास होत नाही तर त्या ठिकाणी बारमाही पर्यटन चालले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सगळ्या गावाने पुढे येऊन राजकारण बाजूला ठेवून आपले गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत ठिकाणी येणारा पर्यटक आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या पाहिजे. काका भिसे हेमंत ओगले यांच्या पावलावर पाऊल टाकून गावातील शिकलेल्या तरुणांनी फुलपाखरू गाईड म्हणून काम करुन येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक माहिती दिली पाहिजे त्यासाठी वन विभागानेही सहकार्याची भूमिका घेऊन त्या प्रकारची थीम तयार करावी.
ते पुढे म्हणाले, परपोली व आंबोली या ठिकाणी फुलपाखरू उद्यान होण्यासाठी आपले प्रयत्न आहेत आंबोली मध्ये फुलपाखरू उद्यानाला म्हणावे तसे यश आले नाही परंतु नव्याने यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत साठी केरळ येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेबरोबर करार झालेला आहे आपण त्या ठिकाणी भेट दिली आहे परंतु इथल्या वन अधिकाऱ्यांनी तेथे भेट देऊन फुलपाखरे हे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी कसे राहतील आणि आवश्यक असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी कशा उपलब्ध करता येतील यासाठी प्रयत्न करावेत. पारपोली हे गाव फुलपाखरांचे गाव म्हणून पुढे यावे यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे भविष्यात गावची बैठक घेऊन एकी करावी गावातील विकासासाठी आवश्यक तो निधी देण्याची आपली तयारी राहील.
प्रास्ताविकात उपवनसंरक्षक श्री रेड्डी व म्हणाले,महोत्सव घेण्यामागे फुलपाखरू संवर्धन आणि संरक्षण हा या मागचा उद्देश असून भविष्यात पर्यटकांना याठिकाणी फुलपाखरू निरिक्षण व अभ्यासकांना अभ्यास दौरे उपलब्ध करुन देण्यात येईल. हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न चालविता जास्तीत जास्त कसा चालविता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल.
महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पारपोली गावामध्ये फुलपाखरांची चित्र प्रतिकृती तयार करून वेगळे वातावरण निर्मिती करण्यात आली होती तर वनविभागाच्या माध्यमातून आवश्यक प्रकारची वनमृत व अन्य प्रकारचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते.या महोत्सवाला प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसिलदार श्रीधर पाटील, उप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, जिल्हा बॅक संचालक महेश सारंग, बबन राणे, माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे, बांधकाचे उपअभियंता वैभव सगरे, आर्किटेक अमित कामत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण,
आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे,
सावंतवाडी वनपरिक्षेत्रपान मदन क्षीरसागर, कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके,मानद वन्यजीव काका भिसे, हेमंत ओगले,वनपाल सदानंद परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page