कणकवलीत शिवसेनेच्या नवदुर्गा मंडपात निमंत्रित संघाच्या रंगल्या फुगड्या…

⚡कणकवली ता.२०-: भोंडला, हादगा, भुलाबाई या विविध नावाने नवरात्र उत्सवातील महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवदुर्गा मंडपात निमंत्रित संघाच्या फुगड्या खेळून जपण्यात आला.


महिला आघाडीच्या सदस्यांनी भोंडल्याच्या फुगडीचा फेर धरला. बिडवाडी महिला फुगडी संघ, ओसरगाव लिंग माऊली फुगडी मंडळ गावठाणवाडी, बाळ गोपाळ हनुमान मित्र मंडळ फुगडी संघ कणकवली कांबळे गल्ली, स्वयंभू फुगडी संघ बांधकरवाडी कणकवली, श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ या पाच संघांनी फुगड्या सादर केल्या. सादरीकरणाला प्रेक्षकांमधूनही भरघोस बक्षीस देण्यात आली.
नाट्य आणि सिने क्षेत्रातील अभिनेते अभय खडपकर आणि नवरात्र मंडळाचे अध्यक्ष रामू विखाळे यांनी फुगडी मंडळांचा सन्मान केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. वैदही गुडेकर,दिव्या साळगावकर, संजना कोलते, माधवी दळवी, स्वरूपा विखाळे,सुप्रिया जाधव,अश्विनी मोरये, रोहिणी पिळणकर , सौ. प्रतिभा अवसरे आदी महिला पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page