⚡कणकवली ता.२०-:
फोंडाघाट भागात मानवी वस्तीमध्ये मागील १५ दिवसापासून बिबट्या वाघाचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याबाबतीत पसरलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट वनविभाग अधिकाऱ्यांकडून वस्तीमध्ये जाऊन बिबट्याबाबत असलेले समज गैरसमज दूर करण्याच्या हेतूने ठीकठिकाणी बॅनर लावून समाज प्रबोधन केले.
फोंडाघाट हवेलीनगर , धनगरवाडा,नवीन कुर्ली वसाहत , पाटबंधारे वसाहत कॉलनी, वाघेरी,लोरे न.1 आदी भागांमध्ये मागील पंधरा वीस दिवसापासून बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरु असून ठिकठिकाणी पाळीव कुत्रे ,मांजरे तसेच गाई वासरू,शेळी मारल्याचे प्रकार घडून आले आहेत.सदर बिबट्या सातत्याने मानवी वस्तीत आढळून आल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली असून या पार्श्वभूमीवर फोंडाघाट वनविभाग अधिकारी कुवळेकर ,पाटील तसेच वनरक्षक अतुल खोत आदींनी फोंडाघाट भागांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्याठिकाणी जावून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत ठीक ठिकाणी मार्गदर्शनपर बॅनर लावून बिबट्याच्या सवयी बाबत,बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये मानवानी कसे वागावे,बिबट्याचे प्रमुख खाद्य काय,तसेच मानवी वस्तीमधील बिबट्याचा वावर कमी करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी येथील नागरिकांनी वनविभाग अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत समाधान व्यक्त केले.
बिबट्याच्या वावराबाबत फोंडाघाट वनविभाग अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन…
