जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण; फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२०- मी सिंधुदुर्ग जिल्हाचा आपघती पालकमंत्री असलो तरी मी सिंधुदुर्ग सुपुत्र आहे.त्यामुळे येणार काळात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासाठी जे काय सहकार्य लागेल ते निश्चितच पालकमंत्री या नात्याने करेल असा विश्वास राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.दरम्यान यावी रवींद्र चव्हाण यांनी पारपोली गावासाठी 80 लाखाचा निधी दिला त्याचा मी घवघवा केला.असे श्री.चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले
श्री चव्हाण आज पारपोली येथे आयोजित करण्यात आलेला फुलपाखरू कार्यक्रमा निमित्त ते व्यासपीठावर बोलत होते.यावेळी श्री. चव्हाण यांच्या हस्ते फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी श्री.चव्हाण बोलतान पुढे म्हणाले की दीपक केसरकर यांनी सिंधू रत्नाच्या माध्यमातून दिलेले योगदान हे फार मोठा आहे असे गौरवोद्गार देखील श्री चव्हाण यांनी यावेळी केले.तसेच या सर्व योजनेच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने रोजगाराची निर्मिती त्यांनी आराखडा तयार केला आहे असे ही श्री चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, उप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, बांधकाचे उपअभियंता वैभव सगरे, आर्किटेक अमित कामत,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी,
सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे,सावंतवाडी वनपरिक्षेत्रपान मदन क्षीरसागर, कुडाळ वनक्षेत्रपाल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page