बांदा येथे ११ नोव्हेंबर रोजी भव्य खुल्या व ग्रामीण नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१९-: दरवर्षी प्रमाणे यंदाही बांदा येथील आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त ११ नोव्हेंबर रोजी भव्य खुल्या व ग्रामीण नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ८ ते १० या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. खुल्या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १११११, द्वितीय पारितोषिक ७७७७ रुपये रोख तर ग्रामीण नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय ३००० व तृतीय पारितोषिक १००० रुपये रोख देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी आशिष सावंत, गौरांक साळगावकर किंवा देवेश वारंग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page