Headlines

आमदार राणेंना विचारलेल्या 10 प्रश्नांची पत्रक युवासेनेनी वाटली फोंडाघाट बाजारपेठेत…

⚡कणकवली ता.१९-: युवासेनेने आमदार नितेश राणे यांना विचारलेल्या 10 प्रश्नांची पत्रक फोंडाघाट बाजारपेठेत वाटण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेनेने प्रसिद्ध केलेल्या त्या पत्रकाची. जनतेच्या मनातील प्रश्न या पत्रकाद्वारे आमदार नितेश राणेंना विचारण्यात आले आहेत अशी भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. फोंडाघाट बाजारा दिवशीच ही पत्रक युवासेनेनी वाटली. त्यामुळे पंचक्रोशीतील वाघेरी, हरकुळ खुर्द, घोणसरी, लोरे या परिसरातील नागरिकांना देखील पत्रक वाटण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबू साहेब , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे, महिला उपतालुकाप्रमुख संजना कोलते, फोंडा शहरप्रमुख श्री. पाटकर, सुरेश टक्के, श्याम भोवड, अनिल पटेल, घोणसरी शाखाप्रमुख कृष्णा एकावडे, भाई राणे, संदीप मेस्त्री, युवासेना शहरप्रमुख बंटी उरणकर, साई भोवड, वाघेरी शाखा अधिकारी पंकज रावराणे, लोरे शाखाअधिकारी निलेश रावराणे, सिद्धेश रावराणे, मच्छिंद्र रावराणे, जितेश परब आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page