गोळवण ग्रामपंचायतीच्या सभामंडप बांधकामाचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१८-: गोळवण-कुमामे- डिकवल या ग्रामपंचायतीच्या आदर्श गाव योजनेमधील प्रेरक अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभामंडप बांधणे या कामाचा शुभारंभ गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्या उपस्थितीत कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.

हे काम आदर्श गाव योजने अंतर्गत पहिलेच मंजूर काम असून कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९ लाख २५ हजार ३२५ रुपये, श्रमदान रक्कम २ लाख ३१ हजार ६२५ रुपये एवढी आहे. शुभारंभ कार्यक्रमास आदर्श गाव संस्था अध्यक्ष मंगेश सावंत, कृषि पर्यवेक्षक श्री. सावंत, सरपंच सुभाष लाड, ग्रामपंचायत सदस्य शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले, मेघा गावडे, श्रीमती एकादशी गावडे, ग्रामसेवक श्रीमती अर्पिता शेलटकर, गोळवण, कुमामे, डिकवल येथील ग्रामस्थ नंदादीप नाईक, नारायण परब, प्रल्हाद नाईक, विठ्ठल तळवडेकर, प्रकाश चिरमुले, बाबुराव चिरमुले, कुसाजी तेजम, सुहास घाडी, सत्यवान चव्हाण, मिलिंद पवार, प्रज्ञा चव्हाण, दाजी पाताडे, संजय पाताडे, जनार्दन गावडे, गजानन गावडे, श्रीकृष्ण तेली, नामदेव कुमामेकर, तसेच गावातील शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कामाचे मक्तेदार विजय पालव, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page