बांदा सूळभाटले मार्गे वाफोली रस्ता पूर्णपणे खराब…

खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो:लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी…

⚡बांदा ता.१९-: बांदा सूळभाटले मार्गे वाफोली रस्ता पूर्णपणे खराब झाला असून त्याच्यावर भलेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक तसेच स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

या मार्गावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. आंबोलीतून मुंबई गोवा महामार्गावर येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ हि दिवस रात्र सुरु असते. रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत. पाऊस गेल्याने लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

You cannot copy content of this page